स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हॉटेल कामगाराने आपल्या गायनाच्या कलेतून केले वंदन.
ददौंड(BS24NEWS)
दौंड शहरातील सुरेश सिताराम जाधव ( वय 65) हे हॉटेल साईकृपामध्ये काम करतात हे काम करत असताना त्यांनी त्यांचा गायनाचा छंद चांगल्या पद्धतीने जोपासलेला आहे. सहकार चौकातील साईकृपा हॉटेल मध्ये येणारे जाधव यांच्या परिचयाचे ग्राहक त्यांना जुन्या गाण्यांची एक दोन कडवी म्हणण्याचा नेहमी आग्रह करतात आपल्या कामातुन जसा वेळ मिळेल तसे ते गायनाचा छंद जोपासत आहेत.
आज १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी आपल्या गायनातून भारत मातेला वंदन केले असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायनातून देशभक्तीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुरेश हे त्यांना त्यांच्या कामातून जसा वेळ मिळेल तसा जुन्या हिंदी गाण्यांचा रियाज करतात. त्यांच्याकडे साधा फोन असून त्यात कराओकेद्वारे रियाज करत असतात. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश यांची जुनी गाणी गाण्यात त्यांना रस आहे. जुनी गाणी सुमधूर व अर्थपूर्ण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे तसेच शहरात कुठेही गायनाचा कार्यक्रम असेल त्यावेळी ते आपली गीत गायनाची भूक भागवतात.