पुणे जिल्हा ग्रामीणशैक्षणिक

उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या श्री भानोबा विद्यालय कुसेगावात नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ संपन्न

पाटस(BS24NEWS)

श्री भानोबा विद्यालय कुसेगाव (ता.दौंड) या विद्यालयात सोहन हेल्थकेअर कुरकुंभ व पुणा युनायटेड राऊंड टेबल १४४ यांचे सौजन्याने अमृत महोत्सवाचे औचित्य साधून तीन आर.सी.सी वर्ग खोल्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. या वेळी आकाश गोयल , सोहन हेल्थ केअरचे एम.डी. सोहन चक्कारवार , सनी गुप्ता , सचेत मेहता , श्री तरूण मारलेच्या, स्वप्निल वेल्हाळ , मासूम भाटिया, निखिल देशमुख, संदीप शितोळे, उत्कर्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केशवराव शितोळे ,कुसेगावच्या सरपंच छायाताई मोहन शितोळे , कुसेगावचे उपसरपंच अमोल शितोळे , मोहन शितोळे, गणेश शितोळे, रश्मीताई मनेश शितोळे , मनेश शितोळे , अनिल सुभेदार शितोळे, विजयसिंह शितोळे , विठ्ठल आबा शितोळे, जालिंदर चव्हाण, रशिद शेख , हनुमंत शितोळे, विनोद शितोळे, अनिल शितोळे , सचिन शितोळे , अशोक शितोळे , विश्वनाथ शितोळे, रणजीत शितोळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुंबे यांनी केले तर सुत्र संचालन आर.व्ही.जाधव आणि बी.डी. शितोळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक वाबळे यांनी मानले.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!