पुणे जिल्हा ग्रामीण
देवकरवाडीत गणेशोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
राहु(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील देवकरवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक उपक्रम गणेशोत्सव उत्सव साजरा करण्यात आला.
येथील राजा शिवछत्रपती मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी गावातील साठ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला. भोसरी येथील संजीवनी ब्लड बँकेच्याने रक्तदान शिबिरासाठी बहुमूल्य सहकार्य केल्याची माहिती यश खळदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.
तसेच महिलांसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास देखील परिसरातील बहुसंख्या महिलांनी हजेरी लावली.
अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची भव्य मिरवणूक काढून भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.