क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

दौंड शुगर कारखान्याच्या वसाहतीत चोरी, तीन लाख सत्तावीस हजारांचाऐवज चोरीला

दौंड(BS24NEWS)

दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखान्याच्या कामगार वसाहती मधील बंद फ्लॅट फोडून चोरट्याने तीन लाख सत्तावीस हजार सहाशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संतोष नामदेव पाचरणे(रा. दौंड शुगर कामगार वसाहत, बिल्डिंग-डी, रूम नंबर 7, आलेगाव, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,दि.१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याचा दरम्यान घटना घडली आहे. फिर्यादी दौंड शुगर कामगार वसाहती मध्ये राहतात, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाज्याचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरामधील असणाऱ्या लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख सत्तावीस हजार सहाशे रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. तसेच फिर्यादी पाचरणे यांच्या घराशेजारील बिल्डिंगमध्ये राहणारे कामगार प्रकाश शिवाजी भापकर(सी, बिल्डिंग,रूम नं 7), अजय कुमार रावसाहेब काळे, शिवकांत शंकरराव काळे हे सर्व त्यांच्या गावी गेले असल्यामुळे त्यांची घरे ही बंद होती. चोरट्याने त्यांच्या घरांच्या ही दरवाज्याचा कोयंडा तोडून घरातील सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली असल्याची माहिती फिर्यादी यांनी पोलिसांना दिली आहे. परंतु त्यांच्या घरातील नेमका किती किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे याचा तपशील अद्याप मिळालेला नाही. दौंड शुगर कारखाना परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था असताना या ठिकाणी घरफोडी झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे कारखाना परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची माहिती समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान , लिंगाळी परिसरात एका कंपनीवर कालच दरोडा पडला असताना शेजारील दौंड शुगर कारखान्याच्या वसाहतीत चोरी झाल्यामुळे दौंड पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!