दौंड शहरातील व्यापाऱ्याने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल , प्रतिष्ठित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
दौंड (BS24NEWS)
दौंड शहरातील व्यापाऱ्याने उधारी मागण्याच्या बहाण्याने महीलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातली प्रतिष्ठित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबात दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड गावचे हद्दीत भवानीनगर गोपाळवाडी रोड येथील फिर्यादी महिला हि राहते घरी असताना आरोपी हरीश भक्तु सुखेजा (रा .सुखनेन बिल्डींग छत्रपती संभाजी महाराज स्तंभाजवळ दौंड, ता .दौंड जि. पुणे) हा घरी येवुन माझ्या दुकानातुन आणलेल्या किराणा दुकानाचे मालाचे पैसे कधी देणार आहे असे म्हणून घरी कोणी नसल्याचा फायदा घेवुन वाईट हेतुन माझ्या जवळ येवुन तुझ्या नव-याला पैसे देईचे नसतील तर तु माझ्या सोबत चल असे म्हणत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्यु केले होते.मात्र
फिर्यादी यांनी नवऱ्याच्या व घरातील लोक हाकलून देतील या भीतीने कोणाला ही काही सांगितले नाही .
तसेच दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी आरोपी हरीश सुखेजा याने पुन्हा फिर्यादीच्या घरी येवुन तु माझ्या सोबत चल असे म्हणत तुला राणी बनवुन ठेवतो असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याने फिर्यादी महिलेने याबाबत फिर्याद दिली असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिता चवरे करीत आहेत.