दौंडमध्ये घरफोडी करून १०लाख ७२हजारांचे दागिने लंपास, गुन्हा दाखल
दौंड(BS24NEWS)
दौंड शहरात घरफोडी करून दहा लाख बहात्तर हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केली असल्याची घटना घडली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रिया महेश रणसिंग (रा. एरिगेशन कॉलनी, सहकार चौक , दौंड) ह्या दि.१४ऑक्टोंबर रोजी रात्री आठ ते पावणेनऊ वाजण्याचा दरम्यान घर बंद करून बाहेर गेले असता घरातील मागिल बाजुस असणाऱ्या बाथरूम च्या खिडकीची जाळी काढून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील दहा लाख बहात्तर हजार दोनशे रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले असल्याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिता चवरे करीत आहेत.
दरम्यान दौंड शहर व परिसरात होत असलेल्या घरफोडी व चोऱ्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.