क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यासह इतरांवर ॲट्रॉसिटी , आर्म ॲक्ट, नागरिक हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

दौंड(BS24NEWS)

दौंड शहरातील एका कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यास इतरांविरोधात अॅट्रॉसिटी , आर्म ॲक्ट कलामांतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात फिर्यादी महिला दळण दळण्यासाठी आरोपींच्या घरासमोरून जात असताना आरोपी राशीद शेख यांनी फिर्यादीच्या अंगावरील ओढणी ओढली व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी महिलेने घरी जाऊन आपल्या नातलगांना ही बाब सांगितली.

फिर्यादी महिला व नातलग हे आरोपींनी केलेल्या या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना आरोपींनी मारहाण केली.त्यामुळे फिर्यादी व त्यांचे नातलग घरी परतले. त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून कुटुंबाला तलवार व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एका नातलगाला जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने मारहाण करण्यात आली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या गल्लीत राहू नका अशी दमदाटी ही आरोपींनी केली.

या पीडित महिलेच्या तक्रारीवरून राशिद इस्माईल शेख, वाहिद खान, अरबाज सय्यद, जुम्मा शेख, इलियास शेख, वसीम शेख, बादशहा शेख, जिलानी शेख व इतर १० ते १२ यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती, नागरिक हक्क संरक्षण कायदा तसेच आर्म ॲक्ट कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!