राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रामदास दिवेकर यांचे निधन
दौंड(BS24NEWS)
दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वरवंड ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामदास जनार्दन दिवेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
वरवंड (ता.दौंड) येथील रामदास जनार्दन दिवेकर (वय ७५) यांचे गुरुवारी (दि. १) रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.रामदास दिवेकर यांनी वरवंड ग्रामपंचायत चे सरपंच, भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद भूषविले होते.त्यांनी वरवंड गावात शासकीय औद्योगिक संस्था आणण्यासाठी तसेच नागनाथ शिक्षण मंडळ स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती
वरवंड ग्रामपंचायत ची भव्य इमारत त्यांच्या सरपंच पदाचा कालावधीत उभारण्यात आली होती
पुणे जिल्हा दुध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांचे ते वडील होते.