पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

७ डिसेंबर रोजी फेरफार अदालत, फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात-जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे(BS24NEWS)

सात-बारा’चे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे महाराजस्व अभियानांतर्गत ७-१२ अर्थात ७ डिसेंबर या तारखेचा योग साधून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन केले आहे.

 

नागरिकांच्या कामकाजाचा निपटारा गतीने होण्याच्या दृष्टीकोनातून फेरफार अदालत आयोजित करण्यात येते. यावेळी फेरफार अदालतीशिवाय सातबारा मधील त्रुटी दुरुस्त करणे तसेच तक्रार नोंदी विहीत मुदतीत निर्गत करणे, नागरिकांच्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण करणे, संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आदी दाखले वितरीत करणे आदी कामकाज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

 

फेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!