दौंड शहरात जैन बांधवांचा मोर्चा…….
दौंड(BS24NEWS)
झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे अतिशय पवित्र असे सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथे केंद्र सरकारने पर्यटन क्षेत्र जाहिर केल्याचा निषेध करण्यासाठी जैन समाजाच्या वतीने
दौंड शहरात मोर्चा काढण्यात आला .
या मोर्चात दौंड चे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांसह मोठ्या संख्येने जैन समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते .
दौंड शहरातील विमल पार्श्वनाथ मंदिर येथून दौंड तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला . दौंड तहसीलदार कार्यलयात जैन समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .
जैन धर्मियांचे अतिशय पवित्र असे सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथे पर्यटन स्थळ करण्याचा
झारखंड राज्याने घेतलेला निर्णय हा निश्चितच निषेधार्ह आहे . सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी बोलताना दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी केली आहे. यावेळी दौंड शहरासह तालुक्यातील जैन बांधव उपस्थित होते.