भिमा पाटस कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत…
दौंड(BS24NEWS)
भिमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा अडचणींचा काळ संपला असुन कारखाना आगामी काळामध्ये दमदार वाटचाल करणार असल्याचे प्रतिपादन भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले.पाटस (ता.दौंड) येथे कारखान्याच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना कुल पुढे म्हणाले की, भिमा सहकारी साखर कारखाना हा सहकारीच राहणार आहे. कारखाना सुरु करत असताना तो सहकारी कसा राहील याची काळजी घेतली आहे. ही संस्था सभासदांच्या मालकीची असावी असा आमचा मानस होता. कारखाना सुरु करण्यासाठी देशाचे सहकारमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठया प्रमाणावर सहकार्य केले आहे. कारखाना चालविण्यासाठी घेण्यासाठी तिन वेळा टेंडर काढण्यात आले होते मात्र टेंडर मध्ये कर्ज पूर्ण भरायचे आणि हि संस्था भाड्याने चालवायला घ्यायची यामुळे कोणीही तयार होत नव्हते.यासाठी एमआरएन ग्रुपचे मुर्गेश निराणी यांनी हा कारखाना चालवायला घेवुन सहकार्य केले असल्याचे ही त्यांनी सांगितले.
संस्था सुरु होऊन शेतकऱ्यांचा ऊस गाळप व्हावा व संस्था ही शेतकऱ्यांचा मालकीची राहणार आहे.
कारखान्यावर पुणे जिल्हा बँकेचे कर्ज होते. या बँकेच्या नेतृत्वाशी चर्चा केली त्यांनीही मदत केली. असुन याबाबत अजित पवार यांचे आभार ही मानले आहेत.
कारखाना अडचणीतून मार्गक्रमन करीत असताना वेळ आल्यावर माझी स्वतः ची मालमत्ता हि कारखान्यासाठी तारण ठेवली आहे.
मात्र काही जण कारखाना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करीत होते.
यामुळे यंदाचा हंगाम सुरू होण्यास उशिर झाला आहे असेही ते म्हणाले.
कारखान्याची सभा सुरु झाल्यानंतर सुरवातीलाच सभासद हरिदास लाळगे यांनी कारखाना सभासदांच्या मालकीचा राहुन तो चालवायला देण्याचा निर्णय घेवुन कारखाना सुरू केल्याबद्दल चेअरमन व संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव मांडला तो एकमताने मंजुर करण्यात आला.
त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब निभे यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले या वेळी सर्वच विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
तानाजी दिवेकर यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला तो ठराव हि एकमताने मंजूर करण्यात आला.
वसंत साळुंके यांनी जिल्हा बँकेने कारखान्यास सहकार्य केल्याबद्दल अजित पवारांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आहे. तो ठराव ही एकमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक तुकाराम ताकवणे, विकास शेलार, चंद्रकांत नातु,पंढरीनाथ पासलकर, आदि उपस्थित होते.