दौंड(BS24NEWS)
दौंड नगर परिषदेच्या साठवण तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनीस विविध ठिकाणी गळती झाल्याने ती तातडीने दुरुस्ती करण्या कामी दि.3 जानेवारी 2023 व 4 जानेवारी 2023 या दोन दिवसासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पाण्याच्या टँकर पुरवठ्यासह पूर्णपणे बंद राहणार आहे. दि.5 जानेवारी रोजी पासून पूर्वीच्या वेळेप्रमाणे पाणीपुरवठा उशिराने व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दौंडकरांना करण्यात आले आहे.