पुणे जिल्हा ग्रामीण

डॉ. अशोक दिवेकर व डॉ. राजेश सुरवसे यांच्या पर्यावरणावरील पेटंटला भारत सरकारकडून मान्यता…..

केडगाव(BS24NEWS)

दौंड तालुक्यातील वरवंड येथील डॉ. अशोक दिवेकर व डॉ. राजेश सुरवसे यांच्या पर्यावरणावरील पेटंटला भारत सरकारकडून मान्यता मिळाली आहे.

एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालय , वरवंड येथील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. राजेश सुरवसे व सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय , केडगाव येथील प्राध्यापक डॉ. अशोक दिवेकर यांनी व्यवसाय व्यवस्थापनावर पर्यावरणीय समस्यांचा प्रभाव (“The impact of environmental issues on business management” ) या विषयावरील पेटंट कंट्रोल बोर्ड ऑफ पेटंट्स, डिझाईन्स व ट्रेड मार्क्स भारत सरकार यांना सादर केले होते. त्यांच्या या पेटंटला भारत सरकारकडून मान्यता मिळाली व भारत सरकारकडून ते प्रकाशित करण्यात आले.

या संशोधनामध्ये पर्यावरणीय समस्या व आंतरराष्ट्रीय व्यवसाय यांच्यामधील आंतरक्रियांचा आणि पर्यावरण संरक्षण या उद्दिष्टांचा अभ्यास समाविष्ट आहे. प्रस्तुत संशोधनामध्ये पर्यावरणीय समस्यांबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे, संबंधित गट, आंतरराष्ट्रीय धोरणे आणि विविध व्यवसायांना अधिक पर्यावरणास अनुकूल होण्यास आणि त्यांच्या ऑपरेशन्समधील संसाधनांच्या भविष्याचा विचार करण्यास भाग पाडतात. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी लोकांना उद्देश पटवून दिले जातात व या दृष्टिकोनातून पर्यावरणविषयक समस्या, आंतरराष्ट्रीय राजकारण, संबंध, मानके आणि पर्यावरणाविषयी जागरूक असण्याबद्दल व्यवसायांची यशस्वी उदाहरणे यांचे विहंगावलोकन प्रदान करतो.

सध्याच्या काळात पर्यावरणाचे रक्षण करण्याकरीता सादर संशोधन अतिशय महत्वाचे आहे. डॉ. अशोक दिवेकर व राजेश सुरवसे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले असून डॉ. सुरवसे यांचे आत्तापर्यंत एकूण १६ पेटंट भारत सरकारकडून प्रकाशित झालेले आहेत.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!