जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण – वासुदेव काळे
दौंड(BS24NEWS)
दौंड शहरात 10 ते 15 जानेवारीदरम्यान जिल्हा स्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.
दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रकिया सहकारी संस्था प्रदर्शनाचे आयोजन करत असून प्रदर्शनाला दोन लाख शेतकरी नागरिक भेट देतील. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषि
कल्याणकारी योजनांची माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर महिला
बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या प्रदर्शनात होणार
आहे. प्रदर्शनात शेतीशी संबंधित 60, आटोमोबाईल कृषी यांत्रिकीकरण संबंधित 60, उत्पादक ते ग्राहक नर्सरी खाद्य संस्कृती यासंदर्भातीलही 150 पेक्षा जास्त स्टॉल उपलबध असतील. प्रदर्शनात तालुका कृषी विभाग पंचायत समिती यांचा सहभाग असेल त्यामुळे शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहचतील.
उत्कृष्ट देशी बैल स्पर्धा, कृषी भूषण पुरस्कार प्रदर्शनाच्या निमित्ताने देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन 2023मद्धे विविध मान्यवरांचा सहभाग त्यांचा शेतकरी बांधवांसोबत होणारा संवाद हा सुवर्ण कांचन योग या निमित्ताने होत आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावी. असे अहवाहन वासुदेव काळे यांनी केले आहे. यावेळी प्रेमसुख कटारिया, माऊली शेळके इ. मान्यवर उपस्थित होते