कृषीपुणे जिल्हा ग्रामीण

बारामती शहराचा विकास केला म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही — आमदार चंद्रशेखर बावनकुळे

दौंड(BS24NEWS)

एकट्या बारामती शहराचा विकास केला म्हणजे संपूर्ण मतदार संघाचा विकास होत नसल्याची टीका नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

ते दौंड शहरात आयोजित कृषि प्रदर्शनात बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार बावनकुळे पुढे म्हणाले की, विकास केला अश्या वालग्ना करणार्यांनी 50 वर्ष सत्ता उपभोगली त्यामुळे विकास केला म्हणजे कोणावर उपकार केले नाही. यांच्या सत्तेचा वापर कंत्राटदारांसाठी मोठ्या प्रमाणावर झाला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

सत्ता हे साध्य नाही ते समाज्याच्या शेवटच्या वक्तीचं भलं करण्याचं साधन आहे.समाजातील एकाचे अश्रू पुसता आले तरी मोठं काम झालं असं मी मानतो असेही ते यावेळी म्हणाले.

मागचे 15 वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांना पुण्यात पूल बांधण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना ट्विट च्या माध्यमातून सांगावं लागतंय मग तुंम्ही काय केलं ? अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली.

तसेच कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्यांवर नाव न घेता अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली आहे.

यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी कृषि प्रदर्शनाबाबत माहीती देत यंदाचे वर्ष हे आठवे असल्याचे सांगत ह्या प्रदर्शनात शेतकरयांना विनामूल्य प्रवेश दिला जात असल्याचे सांगितले . तसेच नविन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्याना मिळावी यासाठीच ह्या प्रदर्शनाचे आयोजन करत असल्याचेही त्यांनी सांगीतले.

यावेळी भाजपचे राज्याचे सरचिटणीस विक्रांत पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी विजय चौधरी, बाबाराजे जाधवराव , राहुल शेवाळे, दादा फराटे, जालिंदर कामठे , माऊली ताकवणे, माऊली शेळके आदी उपस्थित होते .

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!