महाराष्ट्रात काँग्रेस छोडो यात्रा सुरू – माजी मंत्री राम शिंदे
दौंड(BS24NEWS)
राज्यात काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रा येऊन गेली मात्र त्यानंतर या यात्रेवर यात्रा काढून पक्ष मोठा होत नाही असे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगत भारत जोडो यात्रेला घरचा आहेर दिला आहे. विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावेळी राज्याचे माजीमुख्यमंत्री अशोक चव्हाण हे अनुपस्थित राहतात तसेच काल पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार हा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरत नाहीत व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठिंबा मागत आहे .यावरूनच भारत जोडो यात्रा ही महाराष्ट्रात येऊन गेल्यानंतर त्याचे रूपांतर काँग्रेस छोडो मध्ये झाले आहे अशी टीका माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी केली ते दौंड शहरात आयोजित कृषी प्रदर्शनात बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार शिंदे पुढे म्हणाले की , देशात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील मतदारांनाही यापूर्वी गृहीत धरले जात होते . येथील लोकप्रतिनिधी नागरिकांना भेटतही नव्हते मात्र जशा आमच्या फेऱ्या व दौरे वाढले तसे येथील खासदार हे मतदारसंघात दिसायला लागले असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चाहर म्हणाले , 10 वर्षे स्वामिनाथन आयोगाची शिफारशी काँग्रेस सरकारने लागू केली नाही नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताच त्या लागू केल्या. कृषी क्षेत्राचे बजेट 23 हजार कोटींवरून 135 कोटींवर नेले. तसेच पिएम किसान सन्मान निधी 12करोड शेतकऱ्यांना मोदी सरकारने दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार अनिल
बोंडे म्हणाले की ,शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पण उत्पन्न वाढले नाही म्हणून नरेंद्र मोदी यांनीं विविध योजना आणल्या आहेत. जाणताराजा म्हणवणार्यांनी विदर्भातील शेती सिंचन 8 टक्क्यांवर ठेवलं. म्हणून विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतोय असा आरोप त्यांनी यावेळी केला.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी बोलताना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे म्हणाले , राज्यातील व केंद्रातील सरकारच्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कृषी प्रदर्शनातून केलं जातं आहे.
याप्रसंगी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
कृषी भूषण पुरस्कार देण्यात आले ते पुढीलप्रमाणे — धनंजय सोमनाथ आटोळे , तुकाराम नारायण कतुरे, विकास सर्जेराव चोरमोले, लक्ष्मण चोरमले, संजय भिकू पिलाने, मुरलीधर पंढरीनाथ झेंडे, अरविंद भीमराव तावरे, चंद्रभागा महादेव काळे, नारायण चिलू खराडे, दीपक आबासो गुरगुडे, श्रीरंग पार्वती कोंढाळकर, लक्ष्मण दिनकर भोसले.