सविता राठोड हिस कृषी अर्थशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त
दौंड(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील सोनवडी येथील सविता राजू राठोड हिने कृषी अर्थशास्त्र या विषयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर या विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त केली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या पदवीदान समारंभात विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सविता राठोड यांनी राहुरी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. व्ही. गवळी यांच्या मार्गदर्शनात ” पश्चिम महाराष्ट्रातील केळीचे उत्पादन, विपणन आणि निर्यात कामगिरीचे आर्थिक विश्लेषण ” या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. डी. बी. यादव (कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख), डॉ. पोखरकर, डॉ. पवार, डॉ. वाणी व डॉ. निंबाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती मुळे (NFOBC- National Fellowship for Other Backward Classes) आर्थिक अडचण दूर होऊन आचार्य पदवीचा अभ्यास क्रम पूर्ण करता आला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या माहेरी व सासरच्या मंडळींना दिले आहे. त्यांच्या यशाचे परीसरात सर्वत्र कौतुक होत आहे.