पुणे जिल्हा ग्रामीणपुणे शहरराज्य

पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल करा आमदार राहुल कुल यांची मागणी, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यवाहीच्या सुचना…

दौंड(BS24NEWS)

पुणे सोलापूर महामार्गावरील नित्याची झालेली वाहतूक कोंडी, नागिरकांना होणारा त्रास, भविष्यातील गरज तसेच रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध असलेली जागेची अडचण लक्षात घेता हडपसर ते कासुर्डी टोल नाक्यापर्यंत दुमजली उड्डाणपूल होणे गरजेचे आहे अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असता त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचा सुचना केंद्रिय मंत्री गडकरी यांनी दिल्या असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

दौंड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाच्या विविध प्रलंबित समस्या बाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे भेट घेतली.

यावेळी न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता हा रस्ता  पुणे – मुंबई, पुणे – नाशिक, पुणे- अहमदनगर, पुणे-सोलापूर आणि पुणे- सातारा आदी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असून या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून गंभीर अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग – ५४८ डिजी घोषित करण्यात आले आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली असून, त्याचा पाठपुरावा देखील मागील अनेक दिवसापासून करीत आहेत.

त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्ग – ९ पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील २१ ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम तातडीने पूर्ण करावे, राष्ट्रीय महामार्ग – ९ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड ता. दौंड येथील किमी ५८/२०० येथे अतिरिक्त नवीन भुयारी मार्ग बांधण्यात यावा. आदि मागण्या आमदार राहुल कुल यांनी केल्या.

नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग – ५४८ डिजी न्हावरा – केडगाव चौफुला रस्ताचे काम लवकरच सुरु करण्याचे तसेच पुणे – सोलापूर महामार्गासंबंधित विविध समस्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, दौंड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाच्या विविध प्रलंबित समस्या लवकरच मार्गी लागणार असल्याने दळणवळण देखील सुलभ होणार आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!