जिरेगाव खुनातील आरोपी आठ तासांत अटक, पाच दिवस पोलिस कोठडीत
दौंड (BS24NEWS)
जिरेगाव येथील खुनातील आरोपी यांना दौंड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाकडून आरोपींना आठ तासात अटक करण्यात आली असल्याची माहिती दौंडचे पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिली.
ते दौंड पोलिस ठाण्यात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी धस पुढे म्हणाले की,
दि. २९ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड यांना एक अनोळखी २५ ते ३० वर्षे वयोगटातील मुलाचे प्रेत हे मौजे जिरेगाव (ता. दौड जि. पुणे) गावच्या हद्दीत जिरेगाव भोळोबावाडी रोडलगत पडलेले दिसत आहे अशी माहिती मिळाली होती.
त्यानंतर तात्काळ तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवून मयताचा फोटो सर्व सोशल मिडीयाच्या माध्यमाने सर्वत्र पाठवून प्रथम मयताची ओळख पटवण्यात आली. मयत प्रफुल उर्फ मोनू राजेंद्र बारवकर ( वय २६ वर्षे रा. खंडोबानगर बारामती ता. बारामती जि. पुणे ) असून तो बारामती वरून कुरकुंभ मार्गे आपल्या बहीणीकडे घराच्या कामा करीता पैसे आणण्याकरीता गेला होता. त्या अनुशंगाने तपास केला असता आरोपी किशोर उर्फ मोन्या सोमनाथ खंडाळे हा कुरकुंभ पासून काष्टी पर्यंत व तेथून पुन्हा दौंड मार्गे कुरकुंभ पर्यंत सोबत असल्याचे मयताची बहीण यांच्या सांगण्यावरून निष्पन्न झाले असता त्यास ताब्यात घेवून सखोल चौकशी करता त्याने गुन्हयाची कबुली दिली की मी व माझे दोन मित्र आरोपी शुभम उर्फ बाबा उध्दव कांबळे व गणुजी उर्फ आबा रमेश खंडाळे यांनी मिळून पैशाच्या आमिषापोटी कुरकुंभ घाटातील वन खात्याच्या निर्जनस्थळी त्याचा खुन करून त्याचेकडील पैसे व चिजवस्तु काढुन घेवून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने व पोलीसांची दिशाभुल करण्याच्य उद्देशाने मयताची बॉडी मौजे जिरेगाव (ता. दौड जि. पुणे) गावच्या हद्दीत जिरेगाव भोळोबावाडी रोडलगत टाकुन दिली.
या गुन्हयातील तीनही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने
पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.
पुण्याचे पोलिस अधिक्षक अंकित,अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग आनंद भोईटे ,
गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली
दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस ,स्थानिक गुन्हे अनवेष्ण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड ,
पोलीस उपनिरीक्षक शाहाजी गोसावी ,
स्थानिक गुन्हे अनवेष्ण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे , पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील,सहा. पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे , शंकर वाघमारे ,नंदकुमार केकाण ,पोलीस हवालदार असीफ शेख , पांडूरंग थोरात, सुभाष राऊत,
पोलीस नाईक शरद वारे, महेश पवार,योगेश गोलांडे , अमोल देवकाते, सागर म्हेत्रे ,रवि काळे आदींनी या पथकात काम केले.