पुणे जिल्हा ग्रामीणराज्य

वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकात थांबा द्या – आमदार राहुल कुल

दौंड(BS24NEWS)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनला दौंड स्थानकात थांबा दयावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्राला दोन राज्यांतर्गत वंदे भारत गाड्या मिळणार आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते शिर्डी रेल्वे मार्गावर धावणार आहेत. देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झेंडा दाखवुन लोकार्पण होणार आहे. यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनची नियमित सेवा सुरू झाल्यानंतर या ट्रेनला दौंड स्थानकात थांबा दयावा अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचेकडे पत्राद्वारे आमदार राहुल कुल यांनी केली आहे

दौंड जंक्शन हे मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. पुण्याहून अहमदनगर, शिर्डी, मनमाड, भोपाळ आणि नवी दिल्लीकडे जाणार्‍या सर्व उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या या स्थानकावरून जातात, अनेक प्रवासी गाड्यांसाठी हा एक प्रमुख थांबा आहे आणि एक प्रमुख मालवाहतूक केंद्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेन दौंड तसेच आजुबाजूच्या बारामती, इंदापूर, श्रीगोंदा आणि कर्जत या तालुक्यांना देखील सोयीची ठरेल . विशेषत: व्यापारी, सरकारी अधिकारी, कामगार व विद्यार्थ्यांना या ट्रेनचा मोठा फ़ायदा होईल याबाबत रेल्वे राज्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!