भाजपा सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार – आमदार अॅड. राहुल कुल
कार्यकर्त्यांनी विकास कामे जनतेपर्यंत पोहचवावी व एकदिलाने काम करण्याचे आवाहन
केडगाव (टीम बातमीपत्र) – दौंड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकतीने लढवणार असून, सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी घवघवीत यश संपादन करेल असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा नुकताच चौफुला येथे संपन्न झाला यावेळी आमदार राहुल कुल बोलत होते.
याप्रसंगी भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, महेश भागवत, हरिभाऊ ठोंबरे, तानाजी दिवेकर, आप्पासाहेब हंडाळ, धनाजी शेळके, पंढरीनाथ पासलकर, तुकाराम ताकवणे, संजय इनामके, विकास शेलार आदी सह भाजपा व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, देशात आणि राज्यांमध्ये आपले विचारांचे सरकार आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. झालेली विकास कामे कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. तालुक्यातील सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वपूर्ण असून कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केल्यास निश्चित यश मिळेल, बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत व सोसायटी मतदार संघात भाजपची परिस्थिती सुधारली आहे. सर्वांनी खांद्याला खांदा देऊन लढले तर निवडणुकीत नक्कीच यश मिळेल. शेतक-यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने दौंड बाजार समिती नावारूपाला आणू. असा विश्वास आमदार कुल यांनी यावेळी व्यक्त केला. या वेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर, निलकंठ शितोळे, आनंद थोरात, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंके आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
वासुदेव काळे म्हणाले, ”केंद्रात व राज्यात भाजपचे सरकारचे आहे. या संधीचा फायदा घेत बाजार समितीचा विकास साधायचा असेल तर दौंड बाजार समितीत सत्ता परिवर्तन झाले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार मोडीत काढला आहे. राष्ट्रवादीला हरविण्यासाठी नव्हे तर शेतक-यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी या निवडणुकीत ताकदीने लढले पाहिजे. शिंदे-फडणवीस सरकारने बाजार समितीत सर्वसामान्य शेतक-यांना मतदानाचा अधिकार दिल्याबद्दल भाजपचे वासुदेव काळे यांनी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मेळाव्यात मांडला. त्यास टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्यात आला.
प्रेमसुख कटारिया म्हणाले, ”विकासकामांवरील लक्ष विचलित करण्यासाठी भीमा पाटसचा मुद्दा उपस्थित केला जातो हे दुर्देवी आहे दौंड बाजार समितीकडून शेतक-यांच्या अपेक्षा पुर्ण होत नाहीत निवडणुकीत हार जीत पेक्षा निवडणुका लढविणे महत्वाचे आहे.