दौंड तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत १८ जागांसाठी २१० अर्ज दाखल.
दौंड (टीम – बातमीपत्र) दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १८ जागांसाठी २१० अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा दौंडचे सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघाच्या सर्वसाधारण जागेसाठी १०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. सेवा सोसायटी महिला राखीव जागेसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात ९, सेवा सहकारी संस्थेच्या इतर मागासवर्गीय मतदार संघात १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सेवा सहकारी संस्थे विमुक्त जाती भटक्यात जमाती मतदारसंघात १७ उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात ४५ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे दुपारी आडते मतदार संघात ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत हमाल मापाडी मतदारसंघात २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे दोन्ही बाजूने प्रथमच एवढे अर्ज दाखल झाल्याचे बोलले जात असून दिनांक ५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर दि. २० एप्रिल पर्यंत अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची पुढील दिशा स्पष्ट होईल असे बोलले जात आहेत.