पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

दौंड शहरात शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

दौंड (टीम – बातमीपत्र)

दौंड शहर व तालुका शिवजयंती समितीच्या वतीने १६ एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

दौंड शहरात तिथीनुसार साजरी होणार्या शिवजयंती निमित्त दौंड – सिध्दटेक रस्त्यावरील भीमनगर येथील स्वर्गीय लाजवंती गॅरेला विद्यालयात रविवारी (ता. १६) सकाळी दहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेसाठी पहिला गट (इयत्ता १ ली ते ४ थी), दुसरा गट (इयत्ता ५ वी ते ८ वी ) , तिसरा गट ( इयत्ता ९ वी ते १२ वी) आणि चौथा गट – खुला गट, असे चार गट तयार करण्यात आले आहेत. खुल्या गटासाठी १) जागतिक राजनेतृत्वाचा मानदंड – छत्रपती शिवाजी महाराज २ ) कोरोना नंतरचे जग ३ ) स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड – छत्रपती संभाजी महाराज, असे तीन विषय देण्यात आले आहेत. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

स्पर्धेचे नियम, गटनिहाय विषय, विनामूल्य नाव नोंदणी व माहितीसाठी शिक्षक सोमनाथ लवंगे ( ७०८३२७६१८३) किंवा डॅा. प्रा. अरूणा मोरे ( ९८५००१४५७३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!