कृषीपुणे जिल्हा ग्रामीण
दौंडमध्ये बैलगाडीवर कोसळली विज, बैलगाडीसह ट्रॅक्टरला ही लागली आग…….
दौंड (टिम – बातमीपत्र) दौंड तालुक्यात विजेच्या कडकडांटाह वादळी वारे व अवकाळी पावसाला सुरावात झाली आहे.
दौंड शहरासह ग्रामीण भागात संध्याकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास विजेचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर जोराचा वारा सुटला व थोड्या वेळाने अचानक पावसास सुरवात झाली. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे
दौंड शहरातील स्वामी समर्थनगर या ठिकाणी लिंगाळीचे माजी उपसरपंच गणेश जगदाळे यांच्या घरासमोरच विज पडल्याने त्यांच्या दारात उभी असलेल्या बैलगाडीने पेट घेतला तसेच त्या बैलगाडीच्या शेजारीच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे टायरदेखील त्यामुळे जळाले आहेत. कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगितले जात असले तरी नागरिक भयभीत झाले आहेत.