नाराजी नाट्यानंतर अजित पवारांच्या निशाण्यावर थेट संजय राऊत ? मुंबईमधील पत्रकार परिषदेत काय म्हणाले अजित पवार…….
मुंबई ( टिम – बातमीपत्र) आमचं (राष्ट्रवादीच) वकीलपत्र कोणी घेण्याचे कारण नाही असे वक्तव्य करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे ?. दोन दिवसांच्या नाराजी नाट्यानंतर प्रथमच अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर थेट संजय राऊत असल्याचे आज झालेल्या मुंबईमधील पत्रकार परिषदेमधून समोर आले आहे, त्यामुळे अजित पवार यांनी जरी राजकीय भुमिका स्पष्ट केली असली तरी राज्यातील राजकारणाची राजकीय संभ्रमता कायम आहे…
मागील दोन दिवसांपासून अजित पवार हे भाजपमध्ये जाणार अश्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दुपारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ही भूमिका स्पष्ट करत असताना पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता आमचे वकील पत्र घेऊ नये असा सज्जड इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे म्हणाले की, बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत. ज्यावेळेस पक्षाची मीटिंग होईल त्यावेळेस मी हा प्रश्न विचारणार आहे . त्या प्रवक्त्यांनी त्यांच्या पक्षाची भुमिका जरूर मांडवी त्यांचे मुखपत्र आहे त्याबाबत बोलावे उगाच आमचे वकीलपत्र कोणीही घेवु नये असे आपल्या भाषेत त्यांनी सांगितले.