दौंड (टीम बातमीपत्र) – दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, कात्रज दूध संघाचे माजी संचालक स्वर्गीय नानासाहेब फडके यांच नुकतंच निधन झालं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ वेळी स्व. नानासाहेब फडके यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम व मित्र पक्षांच्या जनसेवा विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ चौफुला (ता. दौंड) येथील बोरमलनाथ मंदिरात फोडण्यात आला. यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांच्यासह तालुक्यातील भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौंड तालुक्याचे स्वर्गीय आमदार स्व. सुभाष अण्णा कुल व स्वर्गीय नानासाहेब फडके यांचे घरोब्याचे संबंध होते. काही दिवसापूर्वी नानासाहेब फडके यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी आमदार राहुल कुल यांनी उपस्थित राहून आदरांजली व्यक्त केली होती.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल मधून नानासाहेब फडके यांचे चिरंजीव दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सागर फडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र राष्ट्रवादी कडून यांना उमेदवारी नाकारण्यात आली, असताना भाजपा व मित्र पक्षाच्या वतीने स्व.नानासाहेब फडके यांना वाहिलेली श्रद्धांजली हा चर्चेचा विषय ठरत आहे.