कि.गु. कटारिया महाविद्यालयाच्या वतीने वृक्षसंवर्धन आणि प्लास्टिक संकलन कार्यक्रम
दौंड(टीम – बातमीपत्र)
दौंड येथील स्व. किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सोमवार दि.8 मे रोजी सकाळी नऊ वाजता गुप्तेश्वर मंदिर व मोरे वस्ती नजीक वृक्ष संवर्धनाचे व प्लास्टिक संकलनाचे काम करण्यात आले .
भिमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया यांचे मार्गदर्शनाखाली प्रा. ज्ञानेश्वर गाडेकर व श्रीकृष्ण ननवरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले
असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष समुद्र यांनी दिली.
महाविद्यालयातील 40 मुले व 30 मुली असे एकूण 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी 5 वर्षांपूर्वी रोपन केलेल्या झाडांना आळी करणे व पाणी देण्याचे काम केले व त्या परिसरातील प्लॅस्टिक कचरा संकलनाचे काम केले. तदनंतर वनीकरण कार्यालायजवळ परिसराची स्वच्छता केली डॉ. क्षितिजा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन व माती संवर्धनासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच इतर दौंड व परिसरातील वृक्षप्रेमी संस्थांना रोपणाबरोबर संवर्धन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व जमिनीची धूप थांबवण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी हरित सेनेचे प्रमोद काकडे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रा.गणपत जगताप,प्रा.आबा मुळे ,प्रा. विकास शेलारप्रा.नम्रता नाडगौडा, प्रा.जयश्री लोहगावकर आदींनी परिश्रम घेतले.