पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपतराव निंबाळकर यांचे निधन
केडगाव (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक संपतराव बबनराव निंबाळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. संपतराव निंबाळकर हे नुकतेच दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
संपतराव निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलच्या व्यापारी मतदासंघांतून नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत विजयी झाले होते.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच तालुक्यात शोककळा पसरली आहे.