पुण्यातील व्यवसायिकाला पाच कोटींची मागितली खंडणी , खंडणीखोरांना पकडताना पोलिसांकडून गोळीबार….
दौंड(टीम – बातमीपत्र)
पुण्यातील एका व्यवसायिकाला ब्लॅकमेल करत पाच कोटींच्या खंडणीची मागणी करून पन्नास लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघा खंडणीखोरांना पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्याच्या परिसरात पाठलाग करून पकडले.
दरम्यान, व्यावसायिकासोबत पोलिस असल्याची चाहूल लागताच दोघांनी पोलिसांच्या अंगावर गाडीघालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी पिस्तूलातून दोन राऊंड गाडीच्या पाठीमागील चाकावर फायर केले. त्यानंतर मदतीसाठी आलेले पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने दोघा खंडणीखोरांना पकडले.
दोघेही खंडणीखोर तोतया पत्रकार असल्याचे समोर आले आहे.
याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.