राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने पक्ष्यांसाठी बर्ड फिडर , परळ भांडी वाटप….
दौंड(टीम – बातमीपत्र)
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उन्हाळ्यात पक्षांना अन्नासाठी व पाण्यासाठी वणवण फिरावे लागते त्यासाठी दौंड येथील शेठ जोतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने पक्ष्याच्या अन्नासाठी बर्ड फीडर व पाण्यासाठी मातीच्या परळ भांड्यांचे वाटप हरित सेनेच्या विध्यार्थ्यांना भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुखजी कटारिया,संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया, प्रशालेचे सेवाजेष्ठ शिक्षक शिवाजी रसाळ, अतुल सोनार आदीच्या हस्ते वाटप करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. उन्हाच्या अतितिव्रतेमुळे पक्ष्यांना अन्न व पाणी मिळणे अवघड होते अनेक लहान पक्ष्यांना अन्नपाण्याविना जीव गमवावा लागतो,अनेक पक्षी पाण्याविना तडफताना दिसतात यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली.वही बांधणी कार्यशाळेत सहभागी झालेले हरित सेनेचे विध्यार्थी अथर्व चव्हाण,कुशल बोरा,विराज पवार,शारदा रेड्डी,अक्सा शेख,प्राजक्ता काकडे,आर्या सोनवणे,राहील राठोड, ओम दळवी,प्रसाद बंड, संजय मधुरकर,चैतन्य पालखे,ओम कोळेकर आदी 21 जणांना हरित सेनेचे टी शर्ट,बर्ड फीडर व मातीच्या पक्क्या परळ भांड्याचे वाटप करण्यात आले.विद्यार्थी ही भांडी आपल्या घराच्या बाल्कनीत,गच्चीवर व झाडावर ठेवणार असल्याची माहिती प्राचार्य सत्यदेव खाडे यांनी दिली.या उपक्रमासाठी भीमथडी शिक्षण संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.