दौंड (टीम- बातमीपत्र)
भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कांचन कुल यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज जाहीर केल्या आहेत. यामध्ये कांचन कुल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी कांचन कुल यांनी भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्षपद या पदाची जबाबदारी सांभाळली होती तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवत आव्हान उभे केले होते. यामुळेच कांचन कुल यांना राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.