बारामती लोकसभेची जबाबदारी आमदार राहुल कुलांच्या खांद्यावर
दौंड (टीम – बातमीपत्र)
भाजपच्यावतीने बारामती लोकसभा मतदारसंघची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये आमदार राहुल कुल यांना बारामती लोकसभा मतदासंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्यावतीने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी कमी कालावधीतहि कांचन कुल यांनी पवारांना मतदासंघांत रोखण्यात यश मिळवले होते. त्यामुळेच आगामी बारामती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपाने आमदार कुल यांच्याकडे दिली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभेचा उमेदवार निवडण्यात आमदार कुल यांची भुमिका महत्वाची असणार आहे.