मुंबई (टीम – बातमीपत्र)
आंतरराष्ट्रीय_योग_दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात सहभागी होत योगाभ्यास केला. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.
धकाधकीच्या जीवनात योग काळाची गरज असून ती लोक चळवळ झाली पाहिजे.
योगाच्या माध्यमातून भारताने संपूर्ण जगाला आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. राज्यभरात ३५ लाख लोकांना एकाच वेळेस योग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.