२८ किलोमीटरच्या बंद नळी कालव्यातून दौंड, इंदापूर आणि हवेली ला मिळणार पाणी – आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना मोठं यश…..
दौंड (टीम – बातमीपत्र)
पुणे शहरातून जाणारा खडकवासला उजवा कालवा, डावा कालवा, दौंड, बारामती , पुरंदर मधील जनाई शिरसाई व पुरंदर उपसासिंचन योजनेच्या सुधारणेसाठी अशियन बँकेच्या सहकार्याने राज्य शासन सुमारे १६०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार असल्याचे आश्वासन मागील अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार खडकवासला कालवा ते फुरसुंगी लोणीकाळभोर पर्यंत २८ किमी बंद नळी कालव्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे ३ टिमसी पाण्याची बचत होणार आहे त्याचा फायदा हवेली, दौंड, इंदापूर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. आज दि .२३ रोजी पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाचे भीमा उपखोरेचे कार्यकारी अभियंता योगेश सावंत यांनी या प्रकल्पाच्या बृहत आराखड्याची माहिती दिली. हि माहिती घेत विविध सूचनाही यावेळी केल्या आहेत.
आमदार कुल हे पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी व पुण्याच्या पुर्वेच्या भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नेहमी आग्रही असतात सध्या आमदार कुल यांच्या मागणी केलेल्या कामांना मोठं यश मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.