सशस्त्र पोलीस भरतीसाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध………
दौंड (टीम- बातमीपत्र)
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया २०२१ अंतर्गत तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी www.mahapolice.gov.in व www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे समादेशक विनीता साहू यांनी कळविले आहे.
उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची २ व ३ ऑगस्ट २०२३ रोजी पडताळणी करण्यात आली. गैरहजर राहिलेल्या ३२ उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येणार असून त्यांनी ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता सर्व मूळ कागदपत्र, सत्यप्रत असलेले छायांकित प्रतीचे दोन संच व छायाचित्रासह उपस्थित रहावे. नियोजित दिवशी वेळेत उपस्थित न राहिल्यास उमेदवारांना सशस्त्र पोलीस शिपाई पदाची आवश्यकता नाही असे गृहीत धरुन निवड रद्द करण्यात येईल. तसेच या पदाबाबत उमेदवाराचा कोणताही आक्षेप विचारात घेतला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.