क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण
दौंड शहरात हातात कोयता घेवुन दहशत माजविण्याचा प्रयत्न, दोघे ताब्यात……..
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड शहरात धारदार कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार दि.७ रोजी दौंड शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणारे राकेश टिळक जगताप,सचिन सुरेश नलावडे या दोघांविरोधात दौंड पोलिसांनी ही मोठी कारवाई करत कोयता घेऊन दहशत माजवत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय बाळु घोडके यांनी फिर्याद दिली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.