क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपनीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद……..

दौंड पोलिसांची कामगिरी

दौंड (टीम- बातमीपत्र)

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील होनर लॅबरोटरी लि. कंपनीच्या येथील मटेरियल स्टोरेज रूममध्ये दरोडा टाकून सुमारे ५लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात आले असल्याची माहिती दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
याबाबतची फिर्याद नितीन कैलास थिटे (रा. घारगाव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर सध्या रा. दत्तनगर गोपाळवाडी दत्त दिंगबर अपार्टमेंन्ट) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.२३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास होनर लॅबरोटरी लि.( कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे.) या कंपनीच्या मटेरियल स्टोरेज रूममधील ५ लाख ४० हजार रुपये किंमतीची एम.एन.एस 2 (मॉन्टीलूकास्ट सोडीयम) पावडर दरोडा टाकून चोरी केली.
यानंतर आरोपी संतोष योगेंद्रनाथ मिश्रा (रा. साउथ कॉलनी साहेबगंज तहसिल साहेबगंज रा. झारखंड सध्या रा. भोंगळेवस्ती कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे), पवनकुमार चिकरमाराम भारती (रा. गाजीपुर तहसिल मरमदाबाद राज्य उत्तरप्रदेश सध्या रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे).जितेंद्रकुमार गोपीनाथ तुरी (रा. पहारपुर, पोस्ट दुर्गापुर तहसिल तीनपहाड जि. साहेबगंज राज्य झारखंड),विजयकुमार मोतीमंडल (रा. विजयनगर इथारी, ता. बरीयापुर जि. मुंगेर राज्य बिहार. सध्या रा. कुरकुंभ शेवाळे प्लॉट ता. दौंड जि. पुणे), राजकुमार वित्तरदिन पुष्पाकर (वैध्द रेसिडेन्सी राजपिपला रोड अंकलेश्वर गोखल भरूच, राज्य गुजरात सध्या रा. शेवाळे प्लॉट कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे)हत ही पावडर घेवुन जात असताना फिर्यादी कैलास थिटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडले असता आरोपींनी फिर्यादीला छाती, पोटात बुक्कयांनी मारहाण केली व हातातील लाकडी काठीने जखमी केले.या प्रकरणी दौंड पोलिसांनी पाचही आरोपींना अटक या केली असुन याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद गटकुळ हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!