मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ दौंडमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने निषेध……
दौंड (टिम-बातमीपत्र)
जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनाकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निषेध नोंदवत दौंडमध्ये निवेदन देण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील सराटी येथे लोकशाही मार्गाने व शांततेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निषेधाचे निवेदन देण्यात आले. या दिलेल्या निवेदनात आंदोलनकर्त्यां मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करावे तसेच मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी तातडीने कारवाई करावी या मागण्या करण्यात आल्या आहेत . या निवेदनावर उमेश वीर, मधुकर जठार, सुनील जगदाळे ,महेश जगदाळे, प्रमोद खांगल , अमित पवार, अविनाश गाठे, दादासाहेब नांदखिले, संजय फराटे, योगेश कराळे आदींच्या सह्या आहेत.