टोलबाबत विचारणा केल्यावर कर्मचाऱ्यांकडून मारहाण ,पाटस टोलवर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी…..
पाटस (टिम – बातमीपत्र)
पाटस (ता. दौंड) येथील टोल प्लाझावर टोल कसा काय कट झाला? याबाबत विचारणा केली असता टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी हॉकी स्टिकने मारहाण करत जखमी केल्याबाबत यवत पोलीस ठाण्यात पाटस टोल प्लाझाच्या सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , फिर्यादी सुभाष उर्फ विकास ज्ञानोबा कड (रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास करीत असताना त्यांच्या गाडीचा टोल कट झाल्याचा मेसेज त्यांना आला असता त्यांनी पाटस टोल प्लाझा येथे जात टोल कर्मचारी सचिन माकर याच्याकडे विचारणा केली असता तुला काय करायचे ते कर ? असे म्हणत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता इतर टोल कर्मचारी यांना बोलवून घेत हॉकी स्टिकने मारहाण केली आहे .
याबाबत आरोपी सचिन विठ्ठल माकर , सौरभ माकर , अक्षय राजेंद्र भंडलकर, आनंद माकर , भैय्या शितकल , (सर्व रा. पाटस , ता.दौंड, जि.पुणे) व ज्ञानेश्वर राशनकर ( रा.वरवंड , ता.दौंड, जि.पुणे) या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार बंडगर करीत आहेत.