क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण
दौंडमध्ये चक्क आईनेच मुलीचा गळा दाबून केला खून ……..
दौंड (टीम- बातमीपत्र)
आईने पोटच्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना दौंड मध्ये घडले असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सरिता हरिओम जांगिड हिने तिची मुलगी दीक्षा हरीओम जांगिड हीचा गळा दाबून खून केलेला आहे. हि घटना दि.६रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे .
याबाबतची फिर्याद हरीओम जांगिड (रा.डिफेन्स कॉलनी रेल्वे क्वाटर, दौंड) याने पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत हे पुढील तपास करीत आहेत.