राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्वतःच्या जिभेवरती नियंत्रण ठेवावे : बाबा महाराज खारतोडे
हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत केलेल्या एकेरी उल्लेखावरून बाबा महाराज खारतोडे संतापले...
इंदापूर (राहुल ढवळे – टीम बातमीपत्र)
आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, इंदापूर तालुक्याचे विकासरत्न, यांच्यामुळे इंदापूर तालुक्याचा विकास झाले असे आमचे नेतृत्व हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या बाबत एकेरी उल्लेख करत बेताल वक्तव्य करणाऱ्या इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षांनी स्वतःच्या जिभेवरती नियंत्रण ठेवावे. असे म्हणत इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी प्रवक्ते बाबा महाराज खारतोडे संतापले आहेत.
कोण म्हणे कामगारांचे संसार उध्वत्स केले म्हणुन पायाला दुखापत झाली अरे त्यांना सांगा तालुक्यात संस्था उभारुन कामगारांच्या हाताला काम दिले. त्याच पायांनी आणि सक्षम खांदयानी कामगारांच्या संसाराचा भार वाहिला. कोणाला दुखापत झाली तर लोक हळहळतात. माणुस्की म्हणुन, राजकारण म्हणुन, समाजकारण म्हणुन दुखापत झालेली व्यक्ती बरी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त करणे ही जन रित आहे पण त्या दुःखावरीची खपली काढुन मीठ चोळणारी माणसं समाजात व राजकारणात आहेत यापेक्षा दुर्भाग्य ते काय.
सहनशिलतेपलिकडे टिका टिप्पनी झाली तरी वैचारीक पातळी सोडुन आम्ही कधीही वैयक्तीक टिका केली नाही कोणाच्या दुःखावर मीठ चोळले नाही. वैचारीक अधिष्ठान नसताना ही अपेक्षापेक्षा मोठं राजकीय पद मिळालं की बोलताना असा तोल जाणारंच, असे देखील बाबा महाराज खारतोडे यावेळी म्हणाले.
माननीय हर्षवर्धन पाटील मंत्री असताना रेल्वेने मुंबई प्रवास करत होते, त्याचवेळी इंदापूरचे माजी आमदार कै.गणपतराव पाटील देखील त्याच रेल्वेने प्रवास करत होते. त्यावेळेस अचानक गणपतराव पाटील यांच्या पोटामध्ये वेदना होऊ लागल्या, हे कळताच हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून स्वतः गणपतराव पाटील यांना दवाखान्यात ऍडमिट केले व सर्व यंत्रणा हलवली. हर्षवर्धनजी पाटील यांनी त्यांच्या या संवेदनशील कृतीतून दाखवून दिलं की राजकारण हे राजकारणापुरतच केलं पाहिजे. परंतु आत्ताच्या कृतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष जे बेताल वक्तव्य करत आहेत हे इंदापूरच्या किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाहीये.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांनी जर हर्षवर्धनजी पाटील साहेब व समस्त तालुक्याची जर जाहीर माफी मागितली नाही तरी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय व जशासतसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे देखील बाबा महाराज खारतोडे यावेळी म्हणाले.