बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने सहा तहसीलदार निलंबित , दौंडच्या तत्कालीन तहसिलदारांचा देखील समावेश….
पुणे (टीम – बातमीपत्र)
बदली आदेश निघाल्यावर देखील दोन महिने झाले तरी रुजू न झालेल्यांचा अहवाल शासनाने संबंधित विभागाकडून मागवला. तो प्राप्त झाल्यावर सर्व संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कारवाईचे संकेत मिळताच काही तहसीलदार बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. परंतु, काहींनी त्यानंतरही रुजू होणे टाळले. त्यामुळे शासनाने निलंबन कारवाईचा बडगा उगारला. त्यात वंदना भोसले, बालाजी सोमवंशी(तत्कालीन तहसीलदार दौंड), विनायक थविल, सुरेंद्र दांडेकर, बी. गोरे, पल्लवी तभाने आदींचा समावेश आहे. वंदना भोसले यांची नागपूर येथे खरेदी अधिकारी पदावर, सोमवंशी यांची बेला (ता. उमरेड) येथे अतिरिक्त तहसीलदार पदावर बदली झाली होती. तर इतरांची नागपूर विभागातील इतर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.संबंधित बदली आदेश जून आणि जुलै महिन्यात काढण्यात आले होते.