कुटूबांचे अपार कष्ट, मित्रांची साथ,अन् नवनाथचे यश ….
केडगाव (टीम – बातमीपत्र)
ध्येयवादी दृष्टिकोन, प्रचंड जिद्द आणि अभ्यासातील सातत्य या त्रि-सुत्रीच्या आधारे एखादी व्यक्ती चांगले यश संपादन करू शकते. पुणे जिल्ह्यातील दौंड तालक्यातील दापोडी या लहानशा गावातील नवनाथ बाजीराव कोकरे यांनी एमपीएससी (MPSC) परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
दौंड तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलाने एमपीएससी (MPSC) परीक्षेत चांगले यश मिळवत एमपीएससी (MPSC) अंतर्गत येणाऱ्या मंत्रालय सहायक या पदावर नवनाथने हे घवघवीत यश मिळवले आहे.
एमपीएससी (MPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेत असतात. येथे प्रत्येक विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून असतो. त्यामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थी मुले व मुली ही परिक्षा देतात. मात्र, त्यातून शेकडोच मुले त्यात प्राविण्य मिळवतात. अनेकांना तर अनेक वर्ष मेहनत करुनही या परिक्षेत अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे या परिक्षेला महत्त्वाचे स्थान आहे.अशा परिस्थितीत या परीक्षेचा क्रेझ अजूनच वाढतो. शिवाय एमपीएससीत यश संपादन केल्यानंतर सदर विद्यार्थी अधिकारी बनतो म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची त्याच्या गावापासून ते टेलिव्हिजन पर्यंत सर्वत्र चर्चा असते. दरम्यान एमपीएससी ( MPSC) अंतर्गत येणाऱ्या मंत्रालय सहायक या पदावर नवनाथ बाजीराव कोकरे या तरुणाने घवघवीत यश मिळविलं आहे. यानंतर मित्रांनी व कुटुंबाने त्याचे जंगी स्वागत केले आहे.