पुणे जिल्हा ग्रामीणमनोरंजन

जनसेवा प्रतिष्ठाण, दौंडच्या वतीने गणराया अवॉर्ड २०२३ चे आयोजन

दौंड (टीम बातमीपत्र) जनसेवा प्रतिष्ठाण, दौंडच्या वतीने गणराया अवॉर्ड २०२३ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जनसेवा प्रतिष्ठानच्या संयोजन समितीने दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतून तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात गौरव घडविणारा गणराया अवॉर्ड 2023 आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गणेशोस्तव मंडळाने आपली माहिती केलेली सजावट, सामजिक कार्य, हे लिंक मध्ये भराव. तालुक्यातील प्रत्येक गणेश मंडळांचे परीक्षण करण्याकरिता जनसेवा प्रतिष्ठानची परीक्षा टीम प्रत्येक मंडळांपर्यंत पोहचणार आहे. दौंड तालुक्याच्या तरुणांमध्ये लोकप्रिय झालेले जनसेवा प्रतिष्ठान आयोजित गणराया आवार्ड 2023 यंदाही मोठया दिमाखात होणार आहे. सर्वच मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आव्हान हि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मंडळांनी यामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी https://forms.gle/G13CzAcWhvZmJ1Gk8 या लिंकचा उपयोग करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!