क्राईमपुणे जिल्हा ग्रामीणपुणे शहर

देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास अटक , लोणीकंद पोलिसांची कामगीरी

पुणे (टीम – बातमीपत्र)
मांजरी भागात एक पिस्टल जिवंत काडतुसासह विनापरवाना जवळ बाळगणाऱ्या एकास लोणीकंद पोलिसांनी शिताफिने सापळा रचून जेरबंद केले. याप्रकरणी प्रथमेश अशोक धोंडे (वय 21, रा. माळवाडी हडपसर,पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे म्हणाले की, मांजरी खुर्द स्मशानभूमी जवळ एक संशयित इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन उभा असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक स्वप्नील जाधव व पोलीस शिपाई दत्ता गावडे यांना मिळाली होती. त्यानुसार लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जावून संशयित इसम प्रथमेश धोंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी प्रथमेश धोंडे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त(पूर्व) रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे,गुन्हे निरीक्षक मारुती पाटील, गुन्हे निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस नाईक स्वप्नील जाधव, कैलास साळुंखे,विनायक साळवे, अजित फरांदे,सागर जगताप,पोलीस शिपाई अमोल ढोणे,मल्हारी सपुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब सकाटेक करीत आहेत.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!