कृषीपुणे जिल्हा ग्रामीण

भीमा पाटस कारखाना सहकारीच राहणार,जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने बाजार भाव देणार – चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांची ग्वाही

पाटस (टीम- बातमीपत्र)
भीमा पाटस कारखाना हा सहकारीच राहणार असुन प्रत्येक सभासदास आपले मत मांडता येणार आहे.तसेच आज ही सभा सुरू बोलता येत आहे यावरच हा कारखाना सहकारी असल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली .
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर दि. २९ रोजी दुपारी १ वाजता सभेला सुरुवात झाली.
भिमा पाटसचे कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी प्रास्तविक करताना तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला .चालू हंगामात भीमा पाटस कारखान्याने १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. केंद्रातील सरकारने साखर उद्योगाबाबत घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव अध्यक्ष तथा आमदार कुल यांनी मांडला .
यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब निभे यांनी विषय पत्रिका वाचन केली. व सभेपुढील विषय घेवुन त्यांना सभेची मान्यता घेण्यात आली.
यावेळी चर्चेत भाग घेत पांडुरंग मेरगळ यांनी दोन साखर कारखान्याच्या मधील अंतराची अट वगळावी अशी मागणी केली. तर शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी नंदखिले यांनी भीमा पाटस कारखाना ज्या निराणी ग्रुप ला चालविण्यासाठी देण्यांत आला आहे त्यां निराणी ग्रुप ने कर्नाटक राज्यात ३६०० रुपये प्रतिटन बाजारभाव दिला असून तो बाजार भीमा पाटस ने देखील ऊस उत्पादक ना द्यावा अशी मागणी केली तर अरविंद जगताप यांनी अहवाल मधील आर्थिक विषयावर चर्चा केली
दरम्यान दोन तास सुरू असलेल्या या सभेत भीमा पाटसचे संस्थापक अध्यक्ष कै.मधूकाका शितोळे यांचा फोटो वार्षिक अहवालात छापला नाही म्हणून जोरदार खडाजंगी झाली तर यावर खुलासा देताना भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांनी सांगितले की , गेल्या तीन वर्षात अहवालात कोणाचेही फोटो छापण्यात आलेला नाही. मागील तीन वर्षात एकदाही यावर कोणीही बोलले नाही आत्ता मात्र फक्त सभेला न येता अहवाल जाळायचा ही भुमिका योग्य नाही.
तसेच १९९२ साली मधूकाका शितोळे यांच्या पॅनेलला पराभूत करून सत्तेत आलेल्या लोकांनी त्यावेळी देखील मधुकाकांचा फोटो का छापला नाही ? असा सवाल उपस्थित केला तर कारखाना कार्यस्थळावर पुढील काळात कै.मधूकाका शितोळे आणि कै.सुभाष अण्णा कुल यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी चर्चेत वैशाली नागवडे,
तानाजी दिवेकर ,बापू भागवत, अशोक हंडाळ, हरिदास लाळगे, वसंत साळुंखे ,पाराजी हंडाळ यांनी चर्चेत भाग घेतला.
या सभेचे सूत्रसंचालन विकास शेलार यांनी केले तर आभार उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी मानले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे गणेश जगदाळे संचालक तुकाराम ताकवणे ,पंढरीनाथ पासलकर ,अंकुश शेळके निळकंठ शितोळे इ मान्यवर उपस्थित होते .

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!