पुणे जिल्हा ग्रामीणराज्यविशेष बातमी
आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यास मोठं यश, दौंड स्वतंत्र उपविभागीय कार्यालयाचा शासन निर्णय जाहीर…..
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यात दौंड येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय स्थापन करण्याबाबतचा महसूल विभागाचा शासन निर्णय आज जाहीर झाला आहे. आमदार राहुल कुल यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
आज दि.६ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभाग निर्माण होऊन यामध्ये पाच पदे निर्माण करण्याचा निर्णय देखील यामध्ये घेण्यात आला आहे.
दौंड स्वतंत्र उपविभाचा प्रश्न मार्गी लागल्याने आमदार राहुल कुल यांनी निवडणूकीत दिलेल्या आश्वासनातील हे काम मार्गी लागले असुन दौंडकर नागरिकांची कामे आत्ता दौंड मध्येच मार्गी लागणार आहेत.