आमदार राहुल कुलांमुळे रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी ..
दौंड (टीम – बातमीपत्र)
आमदार राहुल कुल यांच्यामुळे सोनवडी (ता. दौंड) येथील सोनवडी ते शिंगाडेवस्ती या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सोनवडी (ता. दौंड) येथील शिंगाडेवस्ती येथे जाण्यासाठी खुप खराब रस्ता होता हि बाबा आमदार राहुल कुल यांच्या निदर्शनास स्थानिक कार्यकर्त्यांनी घातली असता आमदार राहुल कुल यांनी या रस्त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला असून त्यानुसार या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन यशवंत सेवा सोसायटीचे संचालक दिलीप पवार (पाटिल) , माजी सरपंच रमेश निवंगुने , पत्रकार विशाल धुमाळ,गणेश पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य देविदास धुमाळ, प्रदिप धुमाळ, सुरेश भोसले , संदीप पवार, शिवाजी शिंगाडे, शाम सोनवणे, चंद्रकांत काकडे, शेखर पवार, कुमार पवार, दादा बिटके, लहू खोमणे, राहुल कदम , सुरेश सुर्वे, दत्तू खोमणे, शशिकांत काळे, सोमनाथ खोमणे सुरेश धुमाळ, ऋषिक धुमाळ, अक्षय धुमाळ यांच्या हस्ते आज दि.१५ रोजी करण्यात आले.
या रस्त्याच्या कामामुळे ५० कुटुंबांची येण्या – जाण्याची सोय होणार असुन तसेच हाच रस्ताa सुमारे २०० एकर शेतीसाठीही उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने सोनवडी परिसरातून आमदार कुल यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.