पुणे (टीम – बातमीपत्र)
ॲड.विक्रमजीत सिंग यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) पुणे शहरच्या (लीगल सेल ) सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
मंगळवारी त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
नियुक्ती पत्र दिल्यानंतर बोलताना सिंग म्हणाले की , राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार आणि ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेच्या पर्यत पोहचविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर वरिष्ठ मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल.