घरफोडी करून आठ लाखांची चोरी……..
यवत (टीम – बातमीपत्र)
वरवंड (ता. दौंड) येथील बारवकर वस्तीवर राहत्या घराचे बाहेरून लावलेले कुलुप तोडून 8 लाख 6 हजार 501रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची माहिती यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,
दि.27 रोजी रात्री 10 ते दि.28 रोजी रात्री 12 वाजुन 15 मिनिटांच्या सुमारास वरवंड ता.दौंड जि.पुणे बारवकरवस्ती गावचे हददीत फिर्यादी महादेव ईश्वर जाधव (वय- 61 वर्षे , रा. बारवकर वस्ती,वरवंड ता.दौंड जि.पुणे )यांचे राहते घराचे बाहेरून लावलेले कुलुप दोन अज्ञात इसमांनी कशाचेतरी सहयाने तोडून आतमध्ये प्रवेश करुन फिर्यादी महादेव जाधव
यांचे घरातील लोखंडी कपाटामधील पर्स मधील सोन्याचे दागिने , रोख रक्कम व किचन रूममधील स्टिलचे डब्यामधील सोन्याचे दागिने असा एकुण 8,06,501 रूपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला असुन याप्रकरणी दोन अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे करीत आहेत.